Wednesday, March 28, 2007

प्रात्यक्षिकं २००७ .. एक अनुभव.

one evening in mid-january (Its past 9pm) :आम्ही चार जण दिनानाथ च्या एका conference room मधे बसलो. काहीही सुचत नव्हतं. अत्ता पर्यंत आपण प्रात्यक्षिकं करणार नाही असंच म्हणत आलो होतो. आणि आज अचानक ठरवलं की "आपला सहभाग असावा". कारण पण तसंच आहे.. ही प्रात्यक्षिकं नेहमी पेक्षा वेगळी असणार आहेत. आज झालेल्या बैठकी मधे कळलंय... १०००० प्रेक्षक, १३ दलं, १८ खेळ, ६ लाख budget !!! कल्पना पण भव्य वाटतीये. आणि ह्या सगळ्या पासुन, मला वेळ नाही म्हणून, माझ्या मुलान्ना हे अनुभवायला मिळू नये हा "गुन्हा" ठरेल.

so आता खेळ ठरवायचाय. अधिच सगळ्यान्नी सगळे नेहमीचे क्रीडा प्रकार घेउन झाले आहेत. अमच्या समोर options फ़ार नाहियेत. म्हणजे ते आम्हालाच शोधावे लागले. Sketing, baseball, मल्ल-खांब.
नवीन आव्हान घ्यायची सवय लागलीये बहुतेक ( का खाज लागलीये ?) अचानक sketing घ्यायचं ठरवलं. सर्व मतानी !!! आणि हा निर्णय घेणार आम्ही ज्यान्ना काहीही sketing येत नाही. फ़क्त अमचा मुलांवर आणि त्यांचा आमच्या वर विश्वास आहे हेच कारण असेल. आणि हा कदाचित अविचार पण ठरला असता. (पण अविचारातूनंच धाडस घडतं.. असा माझा समज आहे).


next week:दल नेहमी च्या वेळात चालू आहे. ६ - ७:३०. मुलांचा उत्साह अमाप आहे. कुठून- कुठून skets मिळवून आणलेत. १८ जण आहेत करणारे मी ठरवलेले, ३ जणान्ना already जमतंय. बाकीच्यान्ना हाताला धरुन चालवतोय. कसं होणार माहित नाही. कारण ground वर मातीवर sketing करता येत नाहीये (disaster !!!) आणि प्रात्यक्षिकांसाठी आम्हाला कोणी ground वर रस्ता बांधुन देणार नाहीये. काही तरी करावं लागेल.


jan 26:gorund च्या आस-पास चे लोक ओरडले. मुलं रस्त्यावर खूप दंगा करतात. आता ते बंद करावं लागणार. आज ठरवलंय की अता practice ताथवडे बागे समोर च्या रस्त्यावर रात्री 9:30 - 11 असेल. पालक सोडतील का शंका आहे.


feb first week:अता दलाची वेळंच रात्री ९ - ११ केलिये. !!! जोरात चालू आहे सराव. पालकांनी मला वाटत होतं त्या पेक्षा फ़ारचं कमी कट-कट केलीये. 31 jan ला रात्री अम्ही तिघं तीन गाड्या घेउन तीन मुलान्ना निगडी ला घेउन गेलो होतो. तिथे रात्री मांडवाच्या फ़ळ्या बांधुन sketing करून बघितलं. जमतय !!! बहुतेक अमचा प्रश्न सुटला असं वाटतंय.


feb second week:बसली !!! घाण बसलीये !! साधा लाकडी फ़ळ्यांचा platform एका दिवसाला 30000/- लागणार !!! मुलं sketing सुन्दर करतायंत. stunts तर बादशाह बसलेत. पण करणार कशावर ? एवढा खर्च एका खेळाला शक्य नाहीये. म्हणून film करायची ठरवलीये !! अता हे "आमच्या" साठी प्रात्यक्षिक आहे. मुलं जे करतात ते अता आम्हाला film वर दाखवायचय. कारण professional cinematographer पण 17000 च्या खाली तयार नाही.


feb 18 !!! :जमलंय !! आज shooting संपवलं. मुलं सगळं छानंच करत होती. आमच्या retakes मुळे जरा राडे झाले. इतकं चांगलं shooting करता कोणाला येतंय !!! तरी समीर ची खूप मदत झाली. त्यानी कधीही त्याचा camera देउन टाकला होता. आता editing करायचंय.. अजुन एक challenge. कोणाला येतं माहित नाही, पण करायचंय. आता द्लावर मागे पडलेल्या गोष्टींचा सराव करायचाय, पद्य आणि संचलन. problem एकंच आहे.. अजुन अमचं परीक्षण एकही झालेलं नाहीये. बाकीच्यांची 3 झालीयेत. आम्ही आधिच नवीन काहीतरी करतोय.. त्याची presentation value काय आहे हेचं कळत नाहीये.


feb 23:अखेरीस आज "प्रयोग" थांबवला. सरळ एका professional कडे जाउन editing करून घेतलं. CD तयार झालीये !!! झाकास !!! आज प्रचंड खूश आहे. गेल्या 1.5 महीन्याची सगळी अनिश्नितता संपल्या सारखी वाटतीये !! आज CD चं परीक्षण करून घेतलं.. public खूश झालंय.


feb 24:आज शेवटची रंगीत तालीम आहे. sketing च्या "मारामारी" मुळे मध्यवर्ती च्या कामात फ़ार कमी लक्ष घालता आलं. आता हे 2 दिवस पूर्ण वेळ गौरव ला मदत करायचीये. मी मैदान-आखणी चं काम घेतलंय. सगळ्या खेळांची main गरज आहे ती. युवक विभाग अक्षरश: "पेटला" आहे !!! 50 जण एका goal साठी वाट्टेल ते करतायत. गेले 2 दिवस रात्री घरी जायला 2 वाजतायत. पुणं भर posters आणि banners लावत हिंडत होतो. प्रचाराची कामं संपलेय. उद्या D-Day.


feb 26:मी स्वर्गात आहे. काल आम्ही जे काही केलंय, ज्या level ला केलंय... ते केवळ अतर्क्य आहे. 6500 लोक आले होते. प्रबोधिनीचा उपक्रम शोभला. उत्तमता कशी असावी.. live करून दाखवलय. personal level वर.. sketing ची film फ़ार भारी दिसली. ते क्षण मी विसरणं अशक्य आहे.. sketing ची announcement झाल्यावर आख्या मैदानावर complete blackout !! 6500 लोकांच्या टाळ्या.. आणि 8 LCD screens वर full volume मधे अमचं sketing ... 4:30 mins.. शेवटची frame.. एकदम 56 flood lights ON.. 6500 लोकांनी उभं राहून वाजवलेल्या टाळ्या.. पूर्ण वेळ मी camera man शेजारी होतो. मी आणि अनिरुध्द. लांब stage वर आमची मुलं.. त्यांच्या वर एक spot light.. दिवे लागल्यावर मी आणि अनि मिठी मारुन उभे होतो तिथेच.. हे सगळं करणारे आम्हीच हे कळल्यावर लोकांनी केलेलं कौतुक..
आज सगळ्या papers मधे first page news आहे.. "प्रबोधिनी ची प्रात्यक्षिकं"..
प्रबोधिनी मधे "high command" मधे आमच्या sketing film चं जबरदस्त कौतुक झालं असं कळलं.


आम्ही एक नवीन खेळ आणि माध्यम मिळ्वून दिलं ह्याचं समाधान आहे.


द्ल म्हणून आम्ही बरंच काही मिळवलंय... मार्गदर्शक म्हणून मी काही मिळवलंय.... विभाग म्हणून एक नवीन level गाठलीये. उत्तमतेचं एक नवीन standard तयार झालंय... सगळं मिळून एक भारी अनुभव मिळवलाय.... आणि at the end काहीही करू शकतो असा आत्मविश्वास मिळालाय.